Talegaon :100 व्या नाट्यसंमेलनाच्या सांगता समारंभात तळेगावच्या कलाकारांचा गौरव

एमपीसी न्यूज – दिनांक 6 व 7 जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड येथे (Talegaon)नाट्य रसिक,सिने नाट्य कलाकार यांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झालेल्या 100 व्या नाट्य संमेलनाच्या सांगता समारंभात तळेगावच्या कलाकारांचा गौरव करण्यात आला.

मावळ भागात नाट्य परिषद रुजविणाऱ्या तळेगाव– मावळ च्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व मध्यवर्ती शाखेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा.सुरेश धोत्रे यांना नाट्य परिषदेचे मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रशांत दामले,सचिव अजित भुरे, १०० व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, संमेलनाचे निमंत्रक मा. भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Khed : बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणास अटक

तसेच कलापिनीचे विश्वस्त व जेष्ठ रंगकर्मी डॉ.अनंत परांजपे व विश्वास देशपांडे (Talegaon)(अ.भा.म.नाट्य परिषदेचे तळेगाव –मावळ शाखेचे प्रमुख कार्यवाह,श्रीरंग कलानिकेतन चे विश्वस्त) यांना नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल मा.उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी मंचावर सांस्कृतिक कार्यमंत्री मा,सुधीर मुंगंटीवार,मा.प्रशांत दामले ,नाट्यसंमेलन अध्यक्ष मा.जब्बार पटेल, नाट्यसंमेलन निमंत्रक भाऊसाहेब भोईर (उपाध्यक्ष मध्यवर्ती शाखा मुंबई) आदी मान्यवर उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे नयनाताई डोळस लिखित व दिग्दर्शित “माझी माय” हे २० बालकलाकारांचा सहभाग असलेले बाल नाट्य व कलापिनी चे गंधार जोशी व चेतन पंडित लिखित,सायली रौन्धळ दिग्दर्शित,मौनांतर स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते मूक नाट्य ‘सय सरी’ या १०० व्या नाट्य संमेलनात सादर झाले.

दोन्ही नाटकांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला भाऊसाहेब भोईर यांच्या कुशल नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड च्या नाट्यपरिषदेच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाने पुणे जिल्ह्यातील रसिकांना एक नितांत सुंदर आणि भव्य दिव्य शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाचा अनुभव घेता आला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.