Pune : राम मंदिर लोकार्पणाचे निमंत्रण नाकारून कॉंग्रेसकडून हिंदूंच्या श्रद्धेची कुचेष्टा; भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांचा आरोप

एमपीसी न्यूज – संपूर्ण भारतवासीयांचे श्रद्धास्थान आणि भारताच्या(Pune) सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आणि प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्ताचे निमंत्रण नाकारून कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपली हिंदुविरोधी मानसिकता उघड केली असून कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचा अपमान केला आहे, अशा शब्दात भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी कॉंग्रेसवर हल्ला चढविला.

मुस्लिम अनुनयाचा वारसा घेऊन हिंदुद्वेषाच्या राजकारणापोटी(Pune) राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाची थट्टा करणाऱ्या व निमंत्रण नाकारणाऱ्या कॉंग्रेसला येत्या निवडणुकीत जनता नाकारेल असा इशाराही त्यांनी दिला.

कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नाकारून हिंदुविरोधी राजकारणाचा आपला अजेंडा उघड केला आहे.

Nigdi : औद्योगिक क्षेत्रांच्या ठिकाणी मॉक ड्रिल
न्यायालयासमोर प्रभू रामचंद्राचे अस्तित्वच नाकारून राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या सहा शतकांच्या संघर्षास अपशकुन करू पाहणाऱ्या कॉंग्रेसकडून दुसरी अपेक्षा नव्हतीच, पण हिंदु समाजाच्या या प्रदीर्घ संघर्षाला मिळालेल्या यशामुळे पोटदुखी सुरू झालेल्या कॉंग्रेसने हिंदूंच्या आराध्य दैवताच्या मंदिराचे राजकारण करावे हे दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.

हिंदूंच्या भावनांची कुचेष्टा करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांना श्रीरामाने सदबुद्धी द्यावी, असा टोलाही त्यांनी मारला. राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण नाकारणाऱ्या कॉंग्रेसला आगामी निवडणुकीत नाकारून हिंदू जनता या अपमानाची परतफेड करेल, असा इशाराही घाटे यांनी दिला. याच कॉंग्रेसने नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार घातला, याच कॉंग्रेसने जी-२० परिषदेवर बहिष्कार घातला, कारगील विजय दिवसावरही बहिष्कार घातला.

जेव्हा जेव्हा देशाची मान अभिमानाने उंचावली तेव्हा तेव्हा कॉंग्रेसची पोटदुखी बळावली आहे, अशा शब्दात त्यांनी कॉंग्रेसवर टीकेची झोड उठविली.
समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राम जन्मभूमीवरील इस्लामी अतिक्रमण हटवून तेथे रामलल्लाची पुनर्स्थापना व्हावी यासाठी सहा शतके सुरू असलेल्या संघर्षास संघ-भाजपाचा कार्यक्रम म्हणून राजकीय स्वरूप देण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असेल, तर या मुक्ती लढ्याचा हिंदु समाजाला अभिमानच वाटतो, असेही त्यांनी नमूद केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.