Alandi : ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर विक्रेत्यांमुळे रुग्णवाहिकेस रहदारी करताना अडथळा

एमपीसी न्यूज : आळंदी पोलीस स्टेशन (Alandi) ते आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य गेट पर्यंतच्या रस्त्यावर हातगाड़ीवाले,भाजी विक्रेते व इतर विक्रेत्यास बसण्यास मनाई आहे.त्यासंदर्भात मार्च 2023 मध्ये पालिकेत तत्कालीन तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. वेळोवेळी तेथील रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागाने कारवाई करावी अशी मागणी त्यावेळी उपस्थित असलेले स्थानिक नागरिक यांनी केली होती.

परंतु सद्यस्थितीत त्या रस्त्यावर हातगाडीवाले, भाजी विक्रेते व इतर विक्रेत्यांची दुकाने असल्याने रस्ता अरुंद पडल्याचे दिसून येत आहे. तसेच रुग्णवाहिकेस तेथून रहदारी करताना अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला भेटत आहे. व वाहतूक कोंडीचे चित्र दिसून येत आहे.

Chikhali : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ठगास अटक; 15 लाख 40 हजार जप्त

मार्च 2023 मध्ये आळंदी पोलीस स्टेशन ते आळंदी ग्रामीण (Alandi) रुग्णालय पर्यंतच्या प्रवासास तेथील रहदारीमुळे अडथळा निर्माण झाला. परिणामी रूग्णावरील उपचारासाठी विलंब झाला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात पोहचण्या अगोदरच एका 21 वर्षीय युवतीला आपला जीव गमवावा लागला होता.

सद्यस्थितीत सुद्धा रुग्णवाहिकेस तेथून (ये -जा करण्यासाठी) रहदारी करताना अडथळा होत असल्याचे दिसून येत आहे. गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णास या रुग्णालयात आणण्यासाठी किंवा या रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी उशीर झाला तर जबाबदार कोण?

येथे बसणाऱ्या विक्रेत्यांना प्रशासनाच्या कारवाईचा धाक उरलेला दिसून येत नाही. हाकेच्या अंतरावरच पालिका प्रशासन असताना विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागाची कारवाई का होत नाही? असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.