Pune : संगणक साक्षरतेतून होणार रोजगार निर्मिती ; प्रभाग दोनमध्ये डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – संगणक साक्षरतेतून रोजगार निर्मिती होऊन (Pune)आर्थिक सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुढाकार घेतला आहे. प्रभाग दोन मध्ये युवकांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

यश फाउंडेशन आणि मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या माध्यमातून(Pune) हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचा परिसरातील युवकांना फायदा होणार आहे.
प्रभाग दोन मधील नागपूर चाळ येथील यश फाउंडेशनच्या कालवश नटराज गंगावणे समाज मंदिर येथे या केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला होप फाउंडेशनचे नितीन पोळ, वेद कॉम्प्युटर ऍकॅडमीच्या सीमा बैस, एम्पॉवर चॅरिटेबल ट्रस्टचे विनय दवे, प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ व मनोदय संस्थेचे पदाधिकारी तसेच त्या भागातील नागरिक, युवक उपस्थित होते.

Sangvi : पवनाथडी जत्रेचा दुसरा दिवस, विविध खाद्यपदार्थाची मेजवानी

तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात न अडकता स्वतःचे शारीरिक आणि मानसिक विकासाबरोबरच कौशल्य विकसित करावे असे मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने डॉ. विष्णू श्रीमंगले यांनी भूमिका मांडली.

पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी तरुण पिढी व्यसनी होऊ नये यासाठी मार्गदर्शन केले. तरुणांना संगणक ज्ञान देवून सक्षम देखील केले जाते जे अनेक पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन केले.

शासकीय योजना राबविण्यासाठी डॉ. धेंडे यांचा पुढाकार

माजी उपमहापौर डाॅ. धेंडे यांच्या माध्यमातून प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून यश फाउंडेशन व महापालिका समाज विकास विभागाच्या माध्यमातुन मोफत संगणकीय प्रशिक्षनाला सुरुवात करण्यात आली आहे. या पूर्वी कोरोनानंतर २५० निराधार कुटुंब यांना रे (RAY) संस्थेच्या वतीने दरमहा १० किलो मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे. तरुण मुलांना जिम, कराटेची सुविधा देण्यात आली. मनपा व शासनाच्या सर्व योजना (आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, शहरी गरिब कार्ड व ईतर ) सर्व आवश्यक कागदपत्र याची सुविधा देण्याचे काम देखील नागपूर चाळ येथील कालवश नटराज गंगावणे समाज मंदीर येथे चालु आहे.

यश फाउंडेशनच्या माध्यमातून युवक आणि नागरिक यांच्यासाठी जे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. युवकांच्या विकासाच्या मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने समुपदेशन, जाणीव जागृती बरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काम केले जात आहे. त्यात भर घालून एचपी साऊंड सोलुशन यांच्या मार्फत संगणक डेस्कटॉप उपलब्ध करून दिला आहे. यापुढील काळात तरुण पिढीला मोफत बेसिक आणि प्रगत संगणक ज्ञान उपलब्ध करून कौशल्य विकसित करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला जात आहे.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.