Chikhali : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ठगास अटक; 15 लाख 40 हजार जप्त

एमपीसी न्यूज – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास (Chikhali) मोठा फ़ायदा असे सांगून नागरिकाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या ठगाला चिखली पोलिसांनी गुजरात येथे जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. दिनेशजी पथुजी ठाकोर (वय 26 रा. छाबलीया, गुजरात) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2023 मध्ये चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीस फ़ोन करुन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफ़ा मिळत असल्याच्या योजना सांगून त्याचा विश्वास संपादित केला. त्यानुसार फिर्यादी यांनी प्रथमता 50 हजाराची गुंतवणूक केली. त्याच्या मोबदल्यात त्यांना सव्वा लाखाचा नफ़ा झाल्याचे दर्शविण्यात आले.

Sangvi : पवनाथडी जत्रेचा 2 रा दिवस, विविध खाद्यपदार्थाची मेजवानी

पुन्हा गुंतवणूक करण्यास सांगून फ़िर्यादी यांना डी मेट अकाऊंट काढून देण्याचे आश्वासन करुन गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. तसेच चेतन पटेल व संजय पटेल यांचे मार्फत ट्रेडींग करा असे सांगून फ़िर्यादीस वेळोवेळी गुंतवणूक करण्यास भाग पाडून आरोपीने फिर्यादी यांना वेळोवेळी तुमचा तोटा झाला आहे. तो तुम्ही पैसे भरा, पैसे भरले नाही तर पोलिस केस होइल अशी धमकी देवून फिर्यादी यांच्याकडून एकूण 15 लाख 47 हजार 259 रुपये घेतले. फिर्यादी यांना त्याचे नावाने डी मॅट खातेच नसल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चिखली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासात चिखली पोलीस स्टेशनचे तपास पथकाने संभाषणासाठी वापरण्यात आलेले फ़ोन, फ़िर्यादीने पैश्याचे व्यवहार करताना वापरलेली बँक खाती याचे तांत्रिक दृष्टीने विश्लेषण करुन आरोपीला निष्पन्न केले.

आरोपीचा मोबाईल बंद असल्यामुळे व तो व्हॉटसअप वर संपर्कात राहत (Chikhali) असल्याने त्याचे लोकेशन मुंबई, सुरत, अहमदाबाद, गुजरात अश्या वेगवेगळ्या ठिकाणी येत होते.  त्यामुळे आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसासमोर होते. तांत्रिक तपासाचे आधारावर आरोपी हा त्याचे मुळ गावी गुजरात या ठिकाणी पळून गेलेला असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी एक पथक गुजरात येथे पाठवून आरोपीला अटक केले. आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यामधील 15 लाख 47 हजार 259 रुपये जप्त करण्यात आले. ही कामगिरी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोगले, पोलीस हवालदार गोडांबे, मोहिते यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.