Alandi : महिला दिना निमित्त आळंदी मध्ये विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

एमपीसी न्यूज : आज जगभरात (Alandi) आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महिलांशिवाय, हे जग अपूर्ण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज काम करत आहेत. महिलांचे कर्तृत्व अधिक सक्षम करण्यासाठी आणि महिलांचे महत्व समाजापर्यंत पोहचवण्यासाठी दरवर्षी जगभरात 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांचे महत्व सांगणारा आजचा हा विशेष दिवस. याच निमित्ताने आज दि.8 रोजी आळंदी मध्ये ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवा बजावणाऱ्या महिलांचा सन्मान आळंदी धाम सेवा व शिवसेना शहर (शिंदे गट)प्रमुख  राहुल चव्हाण यांच्या वतीने सन्मानपत्र, गुलाब पुष्प, डायरी, पेन देऊन करण्यात आला.

यावेळी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, राजमाता महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

Pune : मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – चंद्रकांत पाटील

तसेच आळंदी पोलीस स्टेशन तर्फे आळंदीतील (Alandi) विविध क्षेत्रातील पदाधिकारी महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. पुष्पा  कुऱ्हाडे, मालन घुंडरे, मंगला  वेळकर व मान्यवर महिला भगिनी उपस्थित होत्या. तसेच यावेळी पोलीस महिला भगिनीचा सन्मान गुलाब पुष्प, डायरी, पेन देत आळंदी शिवसेना पक्षप्रमुख राहुल चव्हाण यांनी केला.

यावेळी पो.आ. मच्छिंद्र शेंडे, जालिंदर जाधव व माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, शशिराजे जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.