Bhosari : भोसरीत टोळक्याची दहशत; वाहने अडवून खंडणीची मागणी

एमपीसी न्यूज – भोसरीमध्ये (Bhosari ) टोळक्याने हैदोस घातला. भर रस्त्यात वाहने अडवून वाहन चालकांकडून खंडणीची मागणी करत वाहनाची तोडफोड केली. हा प्रकार शनिवारी (दि. 22) पहाटे तीन वाजताच्या सुमारास शास्त्री चौक, भोसरी येथे घडला.

Chakan : लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

नितीन चंद्रकांत कांबळे (वय 30, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश नरेश गायकवाड (वय 18, रा. आळंदी), दिनेश मधुकर वाघमारे (रा. चक्रपाणी वसाहत भोसरी), पियुष कांबळे (रा. विश्रांतवाडी, पुणे), अजय (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कारमधून शास्त्री चौक भोसरी येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना अडवले. दगड हातात घेऊन आरोपींनी रस्त्यावर दहशत पसरवली. रस्त्याने जाणाऱ्या गाड्या अडवून आरोपींनी पैशांची मागणी केली.

तसेच शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या खिशातून 200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आरोपींनी फिर्यादी यांच्या गाडीवर दगड मारून गाडीचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अविनाश आणि अजय या दोघांना अटक केली आहे. भोसरी (Bhosari ) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.