Chakan : लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – एका बांधकाम व्यवसायिकाने महिलेला लग्नाचे आमिष दाखवण तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार सन 2016 ते 22 जुलै 2023 या कालावधीत आंबेठाण चौक चाकण (Chakan) येथे घडला. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

Rajgurunagar : मनसेच्या राजगुरूनगर शहर कार्यालयात पक्ष प्रवेश व पद समारंभ

 

गणेश रामदास खराडे (वय 29, रा. आंबेठाण चौक, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवले. त्या अमिषातून फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. फिर्यादीत शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच आरोपी सोबत असलेले फिर्यादी यांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण (Chakan) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.