Rajgurunagar : मनसेच्या राजगुरूनगर शहर कार्यालयात पक्ष प्रवेश व पद समारंभ

एमपीसी न्यूज : मनसेचे पुणे जिल्हा अध्यक्ष  समिर थिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष  मंगेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिरोली गावचे महेश खरपासे व त्यांच्या सोबत असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसे मध्ये प्रवेश केला.

Moshi : रस्ता ओलांडताना कारची धडक; पादचारी गंभीर जखमी

 

हा प्रवेश समारंभ राजगुरूनगर (Rajgurunagar) शहर कार्यालयात पार पडला. तसेच खेड तालुक्यातील विविध कार्यकर्त्यांना पदे वाटण्यात आली. यावेळी चाकण शहर अध्यक्षपदी  महेश शिरोळे तर राजगुरूनगर शहर अध्यक्षपदी  सोपान डुंबरे यांची फेरनिवड करण्यात आली.

 

तसेच विभाग अध्यक्षपदी  बारकू पवळे व शिरोली शाखा अध्यक्षपदी  महेश खरपासे यांची नियुक्ती करण्यात आली. या  कार्यक्रमासाठी मनसेचे जिल्हा अध्यक्ष  समिर थिगळे, जिल्हा उपाध्यक्ष  मंगेश सावंत, प्रसिद्धी प्रमुख  भरत बचे, तालुका उपाध्यक्ष  शुभम स्वामी, चांडोली शाखा अध्यक्ष  प्रफुल्ल ताये व  मनसैनिक उपस्थित होते. याबाबत माहिती ज्ञानेश्वर सोळंखे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.