Pimpri : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी (दि. 22) सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दत्तनगर चिंचवड येथे घडली.

अरुण गडांकुश (वय 40, रा. दत्तनगर चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 37 वर्षीय पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेचा पाठलाग केला. फिर्यादी महिलेचा हात पकडून त्यांच्याशी गैरवर्तन करत लगट करण्याचा प्रयत्न केला. या असभ्य वर्तनामुळे फिर्यादी यांचा विनयभंग झाला. दरम्यान आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पिंपरी (Pimpri) पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.