Pimpri : सोशल मीडियावर मेसेज करून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर सतत मेसेज करून एका महिलेला त्रास देत तिचा (Pimpri) विनयभंग केला. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 ऑक्टोबर 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ₊447456015665, ₊14307107859, ₊918987191746, ₊919476321159, 9784503067, 9434391402 आणि सोशल मीडिया अकाउंट धारकाच्या विरोधात गुन्हा (Pimpri) दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : अज्ञात चोरट्याने केले पाच ग्रॅम वजनाचे दागिने लंपास 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला सतत ‘तू मला आवडतेस. मी तुला ओळखतो. आपण भेटू’ असे मेसेज केले. त्यावरून फिर्यादीचा पाठलाग करत मानसिक त्रास दिला. तसेच एका सोशल मीडिया अकाउंट वरून मेसेज करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत त्यांना मानसिक त्रास देत विनयभंग केला. पिंपरी पोलिस  या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.