Pimpri : अज्ञात चोरट्याने केले पाच ग्रॅम वजनाचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज –  खरेदीसाठी आलेल्या महिलेची पिशवी फाडून त्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 31) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पिंपरी मार्केट येथे घडली.

Chikhali : कै नारायण केरबा मुंडे यांच्या पुण्य स्मरणार्थ आयोजित संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची सांगता

ACB Trap : जमिनीची सात बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी मागितली 80 हजारांची लाच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दिनांक 31st March) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी या त्यांच्या नातेवाईकांसोबत एका सराफाच्या दुकानातून दागिने खरेदी करून पिंपरी मार्केट परिसरात इतर खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातील कापडी पिशवी त्याच्याजवळील असलेल्या सूक्ष्म हत्याराच्या साह्याने फाडून त्यातील 35 हजार 325 रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके (Pimpri) चोरून नेले.

याबाबत एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा (Pimpri)दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.