Pimpri : कुत्र्याच्या पिल्लाला लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण

एमपीसी न्यूज – कुत्र्याच्या पिल्लाला लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण केल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्यावरील एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 18) सायंकाळी साडेपाच वाजता गुप्ता ट्रेडर्स (Pimpri) या दुकानासमोर घडली.

गुप्ता (पूर्ण नाव माहिती नाही, रा. निगडी प्राधिकरण) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हितेश जयपाल कुंदनानी (वय 34, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talawade : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून चार वाहने पेटवली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याचे पिल्लू वारंवार (Pimpri) दुकानाच्या समोरील जागेत येत असल्याने गुप्ता याने कुत्र्याच्या पिल्लाला लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच पिल्लाला मारहाण करत दुकानातून बाहेर रस्त्याच्या बाजूला ढकलले. या मारहाणीत पिल्लाला मार लागला असून त्याला प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.