Loksabha election : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना एबी फॉर्म सुपूर्त

एमपीसी न्यूज :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना आज (दि. 19) पक्षाकडून (Loksabha election) एबी फॉर्म देण्यात आला.

Maval Loksabha Election : मावळ लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी ‘या’ प्रश्नांवरही बोलावे

पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन अहिर यांनी एबी फॉर्म सुपूर्त केला. यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्हाप्रमुख माजी आमदार  अॅड गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर, रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बबनदादा पवार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.