Chikhali : गॅस चोरी प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर आणि धोकादायकपणे मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरी करणाऱ्या एका तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 31) मोरेवस्ती, चिखली येथे करण्यात आली.
मयूर सुनील शेगावकर (वय 23, रा. चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह अजय जैन (रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर याने त्याचा मालक अजय याच्याकडून (Chikhali) सिलेंडर आणले. घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये मयूर याने गॅस काढला. तसेच गॅस काढत असताना आरोपीने (Chikhali) कोणतीही सुरक्षेची खबरदारी घेतली नाही. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी कारवाई करून मयूर याला अटक केली. चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.