Pune : सितार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सवाला प्रारंभ

एमपीसी न्यूज – पुण्यातील (Pune) सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सितार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. एरंडवणे येथील गणेशनगर मध्ये डॉ कलमाडी  हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात यावर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Dr. Amol Kolhe : ‘मी साहेबांसोबत’; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची ट्वीट

यावेळी उस्ताद उस्मान खान (सतार), पं विनायक तोरवी (गायन), पं रवींद्र यावगल (तबला), विदुषी आरती अंकलीकर टिकेकर (गायन) यांचा डॉ फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कन्नड संघाच्या सचिव मालती कलमाडी, आयोजक रईस बाले खान, रफिक खान आदी उपस्थित होते.

पं. विनायक तोरवी यांनी कन्नड संघ, धारवाड आणि कलापरंपरा यांची माहिती दिली. ‘धारवाडच्या घराघरात कला आहे. ज्येष्ठ कनिष्ठ असा कुठलाही फरक न करता इथे कलासाधना केली जाते. तिथल्या मातीचाच हा गुणधर्म आहे. कला आणि संस्कृतीचे पूजन तेथे केले जाते. रईस बाले खान आणि कन्नड संघ हीच परंपरा चालवीत आहेत. त्यांनी केलेला सत्कार मला अधिक आनंददायी आहे.

आरती अंकलीकर यांनी अभिजात संगीतात असलेल्या साधकाला बांधून ठेवणार्या ताकदीचा उल्लेख केला. कितीही अडचणी, संघर्ष असला तरी संगीत स्वस्थ बसू देत नाही. संगीत कलाच साधकांना शक्ती, ऊर्जा देते, असे त्या म्हणाल्या.

प्रस्तुत महोत्सवाची सुरवात प्रसिद्ध सुंद्री वादक भीमण्णा जाधव यांच्या सुंद्रीवादनाने झाली. भीमण्णा जाधव हे सुंद्रीसम्राट सिद्राम जाधव यांचे नातू व पंडित चिदानंद जाधव यांचे सुपुत्र आहेत. भीमण्णा जाधव यांचे सुपुत्र व्यंकटेश कुमार यांनी सहवादन केले. त्यांना डॉ अतुल कांबळे यांनी तबल्यावर साथ केली. अनघा परांजपे यांनी सूत्रसंचालन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.