Pune : ‘रिवायत’ या कार्यक्रमामधून उस्ताद हमीद खान यांना आदरांजली

एमपीसी न्यूज – प्रख्यात सतारवादक उस्ताद हमीद खान यांना(Pune) सांगीतिक श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने पुण्यातील सुहाना बसंत फाउंडेशन आणि त्रिगुणा स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या वतीने ‘रिवायत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या शुक्रवार दि. 19 जानेवारी रोजी सायं 5 वाजल्यापासून (Pune)घोले रस्त्यावरील पं जवाहरलाल नेहरू सभागृह या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होईल. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर त्यासाठी प्रवेश दिला जाईल.

Pimpri : गॅस चोरी प्रकरणी तरुणास अटक

कार्यक्रमात कलकत्तास्थित उस्ताद अर्शद अली खान यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायकीचा अनुभव देखील रसिकांना घेता येणार आहे. उस्ताद अर्शद अली खान यांना अमोल माळी (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी) हे साथसंगत करतील.


उस्ताद हमीद खान यांनी सतार ऑनसोंब्ल अर्थात सतारवादन आणि इतर वादन व गायन यांचा मेळ घालीत कार्यक्रम करण्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना याच माध्यमातून श्रद्धांजली वाहण्याचा ‘रिवायत’ या कार्यक्रमाचा उद्देश आहे, अशी माहिती सुहाना बसंत फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद रईस बाले खान यांनी दिली. यावेळी अनुराग जोशी (बासरी), श्यामल बॅनर्जी (सतार नुमा गिटार) हे सतार ऑनसोंब्लचा भाग असतील.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.