Dr. Amol Kolhe : ‘मी साहेबांसोबत’; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची ट्वीट

एमपीसी न्यूज – “जब दिल और दिमाग में जंग हो, तो दिल की सुनो. शायत दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है. पर दिल कभी नहीं. मी साहेबांसोबत”, अशा सूचक शब्दांत (Dr. Amol Kolhe) अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले. याबाबत कोल्हे यांनी ट्वीट केले आहे.

Maharashtra News : सहा जुलै रोजी राष्ट्रपती महाराष्ट्र दौऱ्यावर

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली.  शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते. राजभवनात उपस्थित असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते  सुधीर मुनगंटीवार यांच्याशी डॉ. कोल्हे चर्चा करत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे डॉ. कोल्हे हे अजित पवार यांच्यासोबत असल्याची चर्चा सुरु झाली.

यापार्श्वभूमीवर डॉ. कोल्हे यांनी ट्वीट करुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “जब दिल और दिमाग में जंग हो, तो दिल की सुनो. शायत दिमाग कभी कभी नैतिकता भूल (Dr. Amol Kolhe) जाता है. पर दिल कभी नहीं. मी साहेबांसोबत”, अशा सूचक शब्दांत कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.