Maharashtra News : सहा जुलै रोजी राष्ट्रपती महाराष्ट्र दौऱ्यावर

एमपीसी न्यूज – भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 ते 7 जुलै 2023 या कालावधीत कर्नाटक, तेलंगण आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यात त्या 6 जुलै रोजी महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. नागपूर आणि मुंबई येथील कार्यक्रमांना त्या उपस्थिती लावणार आहेत.

Talegaon : पार्किंगच्या गाड्यांच्या काचा फोडून रोख रक्कम व लॅपटॉप चोरीला

3 जुलै 2023 रोजी राष्ट्रपती कर्नाटकातील मुद्दनहळ्ळी येथे होणाऱ्या श्री सत्य साई मानव उत्कृष्टता विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील. संध्याकाळी त्या कर्नाटकातील राजभवन येथे विशेष असुरक्षित आदिवासी समुहाच्या (PVTG) सदस्यांशी संवाद साधतील.

4 जुलै 2023 रोजी राष्ट्रपती हैदराबाद येथे अल्लुरी सीताराम राजू यांच्या 125 व्या जयंतीदिन समारोप समारंभात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित करतील. 5 जुलै 2023 रोजी राष्ट्रपती गोंडवाना विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करतील. नागपूर मधील कोराडी येथील भारतीय विद्या भवनाच्या सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

6 जुलै 2023 रोजी राष्ट्रपती विशेष असुरक्षित आदिवासी समुहाच्या (PVTG) सदस्यांशी नागपूरमधील राजभवन येथे संवाद साधतील. मुंबईतील राजभवन येथे महाराष्ट्र शासनातर्फे राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी स्वागत समारंभाला त्या उपस्थित राहतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.