Talegaon : पार्किंगच्या गाड्यांच्या काचा फोडून रोख रक्कम व लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या (Talegaon) तीन फोर व्हिलरच्या काचा फोडून चोरट्यांनी गाड्यातील रोख रक्कम व लॅपटॉप चोरले. ही घटना शनिवारी (दि.1) रात्री साडेआठ ते पावणे नऊ या 15 मिनीटांच्या कालावधीत तळेगाव-चाकण रोडवरील एमआर.एप शोरूम जवळ घडली आहे.

याप्रकरणी महिलेने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची क्रेटा गाडी (एमएच 14 के.जे.2780) गाडीची काच फोडून रोख 12 हजार, दुसरी क्रेडा गाडी एमएच 14 एचझेड 1200 मधून 10 हजार रुपये तर एमएच 15 जी एफ 1924 मधून 20 हजार रुपयांचा लॅपटॉप व कागदपत्रे एसा एकूण 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

Wakad : रस्त्यावर थुंकण्याची मानसिकता बदलणे गरजेचे – वंदना चव्हाण

अवघ्या 15 मिनीटांमध्ये (Talegaon) गाड्यांच्या काचा फोडून रक्कम चोरीला गेल्याने एकच खलबळ उडाली आहे. तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.