Wakad : रस्त्यावर थुंकण्याची मानसिकता बदलणे गरजेचे – वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज – “भारतीय नागरिक परदेशात (Wakad) गेल्यावर तिकडे रस्त्यावर थुंकत नाही. मात्र आपल्याकडे सामान्य नागरिक तर थुंकतात शिवाय आलिशान कारमधील देखील नागरिक रस्त्यावर थुंकतात हे बघून चीड येते. रस्त्यावर थुंकण्याची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.” असे मत खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.

सारे जहाँसे अच्छा या संस्थेच्या वतीने वाकड येथील आयआयइबीएम कॉलेजमध्ये या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी 32 हजार किमी वाहन चालवत 20 राज्यात, सिलव्हासा, चंदिगड या दोन केंद्रशासित प्रदेशात थुंकण्याबाबतीत जनजागृती केल्याबद्दल सारे जहाँसे अच्छा संस्थेचे अध्यक्ष राजा नरसिम्हा, संचालिका प्रीती राजा, आयआयइबीएमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.जयसिंग मारवाह यांना इंडिया बुक ऑफ़ इंडियाच्या वतीने रेकॉर्ड नोंदीचे प्रमाणपत्र व पदक देऊन  सन्मानित करण्यात आले.

खा. चव्हाण पुढे म्हणाल्या की,  “बदलते वातावरण हे मानवासमोरील आव्हान आहे. आज आपण गांभीर्याने घेतले नाही, तर भविष्यात शुद्ध हवा घेण्यासाठी पाठीवर ऑक्सिजनचे सिलिंडर सोबत ठेवण्याची वेळ येईल. आज आरोग्याबरोबरच वातावरणातील बदल यावर जनजागृती करणे गरजेचे आहे. यासाठी भरपूर झाडे लावण्याची गरज आहे”.

डॉ.मारवाह म्हणाले की, “पथनाट्य किंवा मॅरेथॉनच्या माध्यमातून (Wakad) स्वच्छतेबाबतीत विद्यार्थी जनजागृती करीत असतात. शिवाय, सौरउर्जेचा वापर करीत कॉलेजच्या आवारात सुमारे 90 झाडांचे संगोपन करीत आहोत”.

Pune : ‘आदी अष्टकम’ नृत्य सादरीकरणाला मिळाला रसिकांचा चांगला प्रतिसाद

यावेळी घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ या विषयावरच्या चर्चासत्रात सत्या नटराजन, सोनिया आगरवाल, बाळकृष्ण सन्मोत्रा, प्रीती राजा, जयेश त्रिपाठी सहभागी झाले होते. यावेळी मधुरा चित्तर, राज स्वामीनाथन, प्रिया पारेख, रेशु अग्रवाल, सुदिप्ता सावंत, विवेक कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, अपर्णा चक्रवर्ती, देवर्षी चक्रवर्ती, अश्विन पोगुला, शिवानी मोहिते आदी उपस्थित होते.

मेजर अशिन पोगुला यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने पुरस्काराचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ॲंड्रिया डिसूझानी  मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.