PCMC : नोकरीभरती परीक्षेचा निकाल 10 जुलैला

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा (PCMC) निकाल 10 जुलैदरम्यान लागणार आहे.

महापालिकेच्या विविध 15 पदाच्या 387 जागांसाठी मे महिन्यात 26, 27 व 28 तारखेस अशा तीन दिवस ऑनलाइन पद्धतीने राज्यभरातील 98 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी 85 हजार 387 जणांनी अर्ज केले होते. प्रत्यक्षात 55 हजार जणांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या उत्तरसूची दोन दिवसांत प्रसिध्द होणार आहे. त्यांच्या लॉगीन आयडीवरून उत्तरसूची पाहता येणार आहे. त्यावर काही हरकती असतील तर त्या तीन दिवसांत महापालिका प्रशासनाला कळविण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.

Pune : ‘आदी अष्टकम’ नृत्य सादरीकरणाला मिळाला रसिकांचा चांगला प्रतिसाद

महापालिकेच्या परीक्षा कालावधीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आली होती. त्यामुळे 89 जणांची परीक्षा घेणे शक्‍य झाले नाही. या सर्व उमेदवारांची परीक्षा 17 जुलैला घेण्यात येणार आहे. तसेच 89 विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निकाल लवकर जाहीर करावा, अशी मागणी परीक्षार्थीकडून करण्यात येत होती. मात्र, त्यांची परीक्षा 17 जुलैला असून तत्पूर्वीच म्हणजे 11 पदाचा 10 जुलैच्या दरम्यान निकाल लावण्यात येणार आहे. यात लिपीक, कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार असल्याचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी (PCMC) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.