Wakad : दिव्यांग बालकांना मोफत वैद्यकीय उपचार व मोफत औषधांचा लाभ

एमपीसी न्यूज – दिव्यांग बालकांसाठी 11 वे मोफत होमिओपॅथी उपचार  शिबीर ( Wakad )   वाकड येथे संपन्न झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा  सी.एस.आर.विभाग, सप्तर्षी फौंडेशन व प्रेडिक्टीव होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने  श्रीमती  लक्ष्मीबाई बारणे उद्यान सभागृह, वाकड ( थेरगाव ) येथे विशेष (दिव्यांग) मुलांकरिता  11वे शिबीर झाले, यात 74  विशेष बालकांनी  या शिबिराचा लाभ घेतला.

सदर शिबिराची सुरुवात 12 ऑगस्ट 2021  पासून केली. या शिबिराच्या माध्यमातून  शेकडो दिव्यांग बालकांच्या कुटुंबाना खूप मोठा आधार मिळाला आहे.  या उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कायमस्वरूपी उपचार दिले जातात. सदर शिबीर कै. डॉ.प्रफुल्ल विजयकर  यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ घेतले जाते. सदर शिबीर संपन्न होण्याकरिता प्रेडिक्टीव होमिओपॅथीचे संचालक डॉ.अमरीश विजयकर तसेच पुणे येथील डॉ.रजत मालोकार यांनी विशेष पुढाकार घेतला .

Wakad : स्थगिती असतानाही पुलाचे काम!

सदर शिबिराला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सी.एस.आर.विभागाच्या सल्लागार श्रुतिका मुंगी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सप्तर्षी फौंडेशनच्या वतीने रंजना सुतार, ज्योती आघारकर, संतोष कांबळे, दीपक चौधरी, श्रद्धा देशमुख, रूशाली बोरसे, अश्विन वाल्हेकर, प्रथमेश कदम, हर्षल सुरुशे, अविनाश वाल्हेकर, यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी पार पाडली.

तसेच प्रेडिक्टीव होमिओपॅथीच्या वतीने  डॉ.अमित पांचाल, डॉ.राकेश शुक्ला, डॉ. रजत मालोकार, डॉ.राणी गुप्ता, डॉ.प्रेषिता ओझा हे तज्ञ डॉक्टर तसेच त्यांच्या टीम मधील डॉ.शिव सिंग, डॉ.सात्विक नारायण, डॉ.तेजवीर कौर, डॉ.धवल शर्मा, डॉ.जीविका, डॉ.मुस्कान, डॉ.रुचिता, डॉ.मरियम, डॉ.प्रियंका, डॉ.नीरज. डॉ.दिव्या, डॉ.निवेदिता, डॉ.हेमंती, डॉ.साक्षी  यांनी मोलाचे सहकार्य केले.

शिबिरासाठी विवेक सोळंके, श्रीमती रंजना सुतार,  संजय चौधरी, संग्राम गोरे , मंगेश सुरवसे, ज्ञानेश ठाकूर या दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले.  कार्यक्रमात “दिव्यांग बांधवांसाठी इंटिग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन” या प्रोजेक्ट अंतर्गत बनविण्यात ( Wakad ) आलेले सॉफ्टवेरद्वारे आलेल्या लाभार्थ्यांचे ऑनलाइन नोंदणीकरण करण्यात आले. या प्रकल्पा अंतर्गत दिव्यांग बांधवांना विविध प्रकारच्या शासकीय व खाजगी सोई-सुविधा त्यांच्या मोबाइल मध्ये अॅप द्वारे उपलब्ध होणार असून सदर संकल्पना भारत सरकारच्या कॉपीराईट विभागाकडून मान्यताप्राप्त असून लवकरच पेटंट कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यात येईल.

प्रकल्पांतर्गत सर्व प्रकारच्या सर्व शासकीय स्तरावरच्या विविध योजना एका क्लिकवर उपलब्ध होणार असून विविध आरोग्य विमा योजनांची सर्व प्रकारची माहिती व क्लेम सेवा एकाच ठिकाणाहून मिळणार असल्याने दिव्यांग बांधवांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यासोबतच सर्व प्रकारच्या दिव्यांग शिबिरांची माहिती तसेच दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संस्था, व्यक्ति, वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्था व व्यक्ति इत्यादि सर्व माहिती एका क्लीकवर मोबाइल मध्ये उपलब्ध होणार आहे.

यामुळे लाभार्थी तसेच दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्ति यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.  सदर प्रकल्प भारतातील पहिला प्रकल्प असून पिंपरी चिंचवड परिसरातील दिव्यांग बांधवांसाठी प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याचे मनोजकुमार बोरसे यांनी सादरीकरणा दरम्यान ( Wakad )  सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.