Wakad : स्थगिती असतानाही पुलाचे काम!

एमपीसी न्यूज – वाकड सर्व्हे नंबर 43 येथील नाल्यावरील लोखंडी ( Wakad) पुलाला महापालिकेने स्थगिती दिली असतानाही पुलाचे काम केल्याचा आक्षेप घेत सुरेश भुजबळ यांनी कारवाईची मागणी केली आहे.

वाकड सर्व्हे नंबर 43 येथे नाल्यावर तात्पुरता पूल बांधण्यासाठी सायकर आणि सुरेश भुजबळ यांनी महापालिकेकडे परवानगी मागितली होती. सायकर यांच्या मिळकती लगत भुजबळ यांची मिळकत आहे. भुजबळ यांच्या मिळकतीकडे येण्या-जाण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने त्यांनी पूल बनविण्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली होती. महापालिका अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली असता भुजबळ आणि सायकर यांचा लोखंडी पूल एकमेकांना काटकोनात मिळत आहेत.

Rajyasabha Election : महाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक

दोन्ही पूल एकमेकांना जोडल्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य होईल. त्यासाठी भुजबळ यांच्याशी समन्वय साधून एकमेकांच्या सहकार्याने सदरचा लोखंडी पूल करणे योग्य होईल. तूर्तास पुलाचे काम थांबविण्यात यावे अशी सूचना कार्यकारी अभियंता देवना गट्टूवार यांनी सायकर यांना केली होती. मात्र स्थगिती असतानाही पुलाचे काम केल्याचा आक्षेप भुजबळ यांनी घेत याबाबत महापालिकेकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. स्थगिती असतानाही जाणूनबुजून पुलाचे काम केले. त्यासाठी सीमाभिंत तोडल्याचा आरोप महेश भुजबळ यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना केला.

कार्यकारी अभियंता देवन्न गट्टूवार म्हणाले की, महापालिकेने दिलेल्या परवानगीनुसार पुलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पूल काढण्याची नोटीस दिली आहे. पूल  काढला नाही तर महापालिका काढून घेईल आणि त्याचा खर्च वसूल करेल असे सांगितले आहे. पूल काढण्यासाठी मुदत मागितली ( Wakad) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.