Pimpri : टाटा मोटर्स तर्फे कर्मचाऱ्यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स कंपनीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त (Pimpri) कंपनीतील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्लांट हेड सुनील कुमार तिवारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिताराम कंदी उपस्थित होते. कंपनीतील विविध विभागातील अकरा जणांना सन 2022-2023 ‘मॅन ऑफ इयर’ म्हणून पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये निलेश सावंत, संजय कदम, नारायण भोसले, जलील इनामदार, नंदकुमार धुमाळ, उत्तम भोसले, सिताराम लडकत, तुषार निकम, संतोष मुजुमदार, तात्यासाहेब शिंदे, राजाराम ढोकळे यांचा समावेश आहे.

Wakad : स्थगिती असतानाही पुलाचे काम!

याबरोबरच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या टाटा मोटर्स कामगार व त्यांच्या मुलांचा देखील सत्कार करण्यात आला. ध्वजवंदनानंतर अग्निशामक विभाग, ट्रेन विभाग, डॉग स्क्वाड, मोटर्स खेळाडू, कॅन्टीन विभाग व 11 मॅन ऑफ द इयर यांचे संचलन झाले. त्यानंतर डॉग शो व अग्निशामक विभागातर्फे आगी विषयी प्रात्यक्षिके सादर करण्यात (Pimpri) आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.