Talavade : रिक्षा पार्क केल्याच्या कारणावरून दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेल समोर रिक्षा पार्क केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात दोघांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना 9 जून रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास तळवडे (Talavade)चौकात रिक्षा स्टॅन्डच्या बाजूला घडली.

Pimpri : करसंवादात प्रश्नांचा ‘ऑन द स्पॉट’ निपटारा

रवींद्र मारुती खवळे (वय 34, रा. तळवडे. मूळ रा. अहमदनगर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पान टपरी चालवतात. आरोपींनी त्यांची रिक्षा टपरी जवळ असलेल्या हॉटेल समोर पार्क केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर दगडाने फिर्यादीला मारून त्यांना गंभीर दुखापत केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.