Hinjawadi : दुचाकीवर सिमेंट पडल्याने पती-पत्नीला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – बांधकामाचे सिमेंट दुचाकीवर पडल्याने पती-पत्नीला मारहाण केली. तसेच त्या दोघांना जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 11) रात्री साडेदहाच्या सुमारास सूसगाव येथे घडली.

सरीना विरन कुट्टी (वय 47, रा. सूसरोड, पाषाण) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदर्श संजय पवार व मंगेश शिरोळे (रा. सुसगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सुसगाव येथील टक्शननगर येथे बांधकाम चालू आहे. शनिवारी फिर्यादी आणि त्यांचे पती त्यांच्या बांधकामावर गेले. काम सुरू असताना बांधकमाचे सिमेंट आरोपी यांच्या दुचाकीवर पडले. यावरून आरोपींनी बांधकाम बंद करा, असे म्हणून फिर्यादी यांच्या पतीला मारहाण केली. फिर्यादी तेथे आल्या असता आरोपींनी दगडाने फिर्यादी यांच्या पोटात व मानेवर मारून त्यांना जखमी केले. तसेच दोघांना जिवे मारण्याचीही धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.