Chikhali : बेकायदेशीर पिस्तुल बाळगणा-या तरुणास अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई  कुदळवाडी, चिखली येथे रविवारी (दि. 12) रात्री साडेदहाच्या सुमारास केली.

सचिन बबुशा शेटे (वय 24, रा. शेटेवाडी, वाडा, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेटे हा रविवारी (दि. 12) रात्री साडेदहाच्या सुमारास कुदळवाडी, चिखली येथे आला होता. त्यावेळी संशयावरून चौकशी केली असता त्याच्याकडे 25 हजार 500 रुपयांचे देशी बनावटीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतुस आढळून आले. पिस्तूल काडतूस जप्त करून त्याला अटक करण्यात आली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.