Bhosari : महापौर चषक टीन ट्‌वेन्टी आंतरशालेय क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात येणा-या महापौर चषक आंतरशालेय टीन ट्‌वेन्टी क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. 12 जानेवारी ते 2 फेब्रुवारी असे 20 दिवस चालणा-या स्पर्धेत 19 हजार 86 विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

भोसरी, इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल येथे स्पर्धेला रविवारी (दि.12) प्रारंभ झाला. यावेळी महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, पद्मश्री मुरलीकांत पेटकर उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये मैदानी खेळ, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, जलतरण, स्केटिंग, हॉकी, कुस्ती, थ्रोबॉल, योगा, क्रिकेट, बास्केटबॉल, हॅन्डबॉल आणि कराटे अशा 20 प्रकारांत विद्यार्थी खेळाडू मैदानात उतरणार आहेत. महापालिकेच्या 23 ठिकाणच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. महापालिका शाळेतील सहा ते सात हजार आणि खासगी शाळेतील 13 हजार असे सुमारे 19 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. अंतिम स्पर्धा बालेवाडीतील क्रीडा संकुलात होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.