Talavade : टेम्पो खाली चिरडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बांधकाम कामगार रस्ता ओलांडत असताना एका टेम्पोने त्यास धडक दिली. टेम्पोखाली चिरडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास तळवडे कॅनबे चौकाकडून महिंद्रा कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

Pimpri : खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप

भीमशाप्पा बंगारम (वय 41, रा. कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे नातेवाईक रविकांत शिवाप्पा इमारते (वय 34, रा. ढोले पाटील रोड, पुणे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो (एमएच 14/ईएम 0382) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमशाप्पा हे तळवडे कॅनबे चौकातून महिंद्रा कंपनीकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता ओलांडत असताना त्यांना एका टेम्पोने धडक दिली. टेम्पोची दोन्ही चाके त्यांच्या पायावरून गेली. त्यात ते गंभीर जखमी झाले.

 

त्यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक टेम्पो घटनास्थळी सोडून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटल आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.