Adipurush : स्टार कास्ट असले तरी ‘आदिपुरुषा’वर प्रेक्षकांची नापसंती; कारण काय?

एमपीसी न्यूज – सध्या भारतात वारे इतिहासावर आधारित (Adipurush) चित्रपटांचे सुरू आहे. त्यातच दिग्दर्शक ओम राऊत यांचा रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’हा चित्रपट 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यावेळी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्यावेळीच अनेकांनी कास्टपासून चित्रीकरणापर्यंत अनेक शंका उपस्थित केल्या. परंतु, ओम राऊत यांनी लोकांना प्रत्यक्ष चित्रपट पाहून अनुभव घेण्याचे आवाहन केले. तरीही जगभरात पहिल्याच दिवशी 140 कोटी रुपयांची कमाई झाली असली तरी प्रेक्षकांच्या मनात हा चित्रपट फारसा उतरलेला दिसून येत नाही.   

 

अध्यात्माची पार्श्वभूमी नाही –

भारतीय संस्कृतीत रामायण आणि महाभारत हा विषय फार आस्थेचा मानला जातो. परंतु, आदिपुरुषच्या काही संवादांमुळे चित्रपट वादात सापडलेला दिसून येतो. आप अपने काल के लिये कालीन बीच रहे है, जो हमारी बहनो को हाथ लागायेंगे उनकी लंका लगा देंगे, कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, जालेगी भी तेरे बाप की आदी संवादांमुळे चित्रपटाला काही संस्थांकडून बंदी आणायची मागणी केली जात आहे. आदिपुरुषकडे चांगला स्टार कास्ट जरी असला तरी बाकीच्या बऱ्याच घटकांमध्ये तो प्रेक्षकांशी मेळ खात नाही. चित्रपटातील बरेच संवाद हे ढिले असून त्या संवादांमध्ये ती प्राचीनता दिसून येत नाहीये.

कास्टिंगमध्येही बऱ्याच चुका –

प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान आदी स्टार कास्ट असलेला हा चित्रपट. बाहुबलीच्या कास्टिंगमुळे कदाचित प्रभासला रामाची भूमिका दिली असली तरी वयोमानानुसार प्रभास रामाच्या (Adipurush) अवरतारत तितक्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला दिसून येत नाही. शिवाय सेफ अली खानची दहा तोंडे, अंगभर टयाटू असलेला मेघदूत या चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शनाची खिल्ली उडवून जातो.  शिवाय त्यांनी परिधान केलेले कपडे यावरही बऱ्याच चर्चा सुरू आहेत. सीतामाईच्या भूमिकेत क्रितीने परिधान केलेल अर्धवट कपडे हा देखील प्रेक्षकांच्या नापसंतीचा विषय ठरला आहे.

आदिपुरुष चे दिग्दर्शक ओम राऊत यांनी सर्व सिनेमा हॉलच्या मालकांना असे निवेदन केले होते, की थिएटरमध्ये एक जागा मारुतीरायासाठी राखीव ठेवावी. बऱ्याच सिनेमा हॉल मालकांनी हे निवेदन ऐकून जागा राखीव ठेवली आहे व त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

 

500 कोटी कुठे गेले?  

चित्रपटाची गोष्ट जरी प्रत्येक भारतीयाला माहित असली तरी प्रेक्षक हे चित्रपटाच्या सीजीआय व चित्रपटासाठी केलेला गेलेला 500 कोटींच्या खर्च कुठे केला गेला, हे बघण्यासाठी जास्त उत्सुक होते. परंतु, बऱ्याच प्रतिक्रियांनी हे दिसून येत आहे, की सीजीआय व इतर तांत्रिक गोष्टींमध्ये चित्रपट कमी पडतो. फक्त तांत्रिक गोष्टीच नव्हे तर चित्रपट इतिहासाचे चित्रण करण्यातही चुकीचा ठरत आहे. रावणाची केशरचना, रावणाचे पुष्पक विमाना ऐवजी एखादा प्राणी दाखवणे व जटायूला गिधाड ऐवजी गरुड दाखवणे अशा चुका देखील चित्रपटात दिसून येत आहेत.

चित्रपट हा रामायण नसून त्यातील केवळ एक प्रसंग असल्याचे ओम राऊत यांचे म्हणणे आहे. नुसता हा चित्रपट रामायणाच्या संदर्भाविना बघितला तरी पूर्ण चित्रपटात आपल्याला कमकुवत अभिनय दिसून येतो. स्टार कास्ट जरी असले तरी चित्रपटाची कास्टिंगही फार खराब दिसून येत आहे.

नवीन आधुनिक प्रकारे रामायण आदिपुरुषने सादर केले असले, तरीही (Adipurush) प्रेक्षकांना रामानंद सागर यांचे रामायण किंवा 1992 मध्ये आलेले रामायणा-द लेजंड ऑफ प्रिन्स रामा हा जपानी ऍनिमेटेड चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनात बसला आहे. आदिपुरुष या चित्रपटाने प्रेक्षकांना निराश केले असून त्या काळी मागासलेले तंत्रज्ञान असूनही रामानंद सागर यांचे कौतुक करण्यात येत आहे व जपानी असूनही रामायणाचा इतिहास हा चांगला दाखवल्यामुळे युगो साको यांचे हि कौतुक केले जात आहे.

Pimpri : खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.