Sangvi : जुनी सांगवी मधून रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज – जुनी सांगवी येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेला रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी चार ते शनिवारी (दि. 17) सकाळी पावणे सहा वाजताच्या कालावधीत लेन नंबर तीन, जयमालानगर येथे घडली.

Adipurush : स्टार कास्ट असले तरी ‘आदिपुरुषा’वर प्रेक्षकांची नापसंती; कारण काय?

 

नजीर नूरमहंमद शेख (वय 40, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच 14/जीसी 3021) त्यांच्या घराजवळ पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी रिक्षा चोरून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.