Students Felicitation : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.(Students Felicitation) हा सोहळा शनिवारी पार पडला. 
 या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, संस्थेच्या खजिनदार गौरी काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर तसेच शाळेच्या सर्व शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात शाळेतून प्रथम आलेली कु. श्रेया ढोरे,  द्वितीय अनुज भसे,  तृतीय सौरभ पाटील व पार्थ काकडे यांनी आपापली मनोगते व्यक्त केली.  शाळेचे मिळालेले योगदान यामुळे हे यश प्राप्त झाले तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी आम्हाला घडवले असं यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितल. (Student Felicitation) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी व शाळेच्या मुख्याध्यापिकानी या विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप सौ.रमा बागुल यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.