Sugaon : दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या महिलांनी पळवले 80 हजारांचे दागिने

एमपीसी न्यूज – दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या(Sugaon) चार महिलांनी ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने 80 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना 14 डिसेंबर रोजी सुसगाव येथील विशाल ज्वेलर्स या दुकानात घडली.

वैभव बाळासाहेब पंडित (वय 35, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Railway : मध्य रेल्वेच्या ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत 858 बालकांची सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या (Sugaon)दुकानात चार महिला दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या. त्यांनी सोन्याच्या मुरण्या आणि टॉप्स खरेदी करण्याचा बहाणा केला. दरम्यान हातचलाखीने दुकानातून 80 हजार रुपये किमतीचे टॉप्स आणि मुरण्या असे 20 ग्राम वजनाचे दागिने चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.