Pune : अचूक वीजबिलांची टक्केवारी वाढली, पण आणखी सुधारणा करा ; मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचे निर्देश

एमपीसी न्यूज – ग्राहकांकडील वीजमीटरच्या फोटो रीडिंगसाठी महावितरणकडून (Pune )सातत्याने उपाययोजना करण्यात येत असल्याने बिलिंगमध्ये अचूकता वाढली आहे. गेल्या वर्षभरात पुणे परिमंडलातील अचूक बिलिंगचे प्रमाण 1.54 टक्क्यांनी वाढले आहे.

तर मीटर रीडिंगच्या अस्पष्ट फोटोचे प्रमाण १.४७ टक्क्यांवर आले आहे. मात्र, 100 टक्के अचूक बिलिंगचे लक्ष्य समोर ठेऊन प्रामुख्याने ग्रामीण भागात आणखी सुधारणा कराव्यात, असे निर्देश पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले.

रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात विभागनिहाय बिलिंग (Pune )व फोटो मीटर रीडिंगबाबत नुकतीच आढावा बैठक झाली. तयावेळी पवार बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) माधुरी राऊत यांच्यासह सर्व ७३ मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक, व्यवस्थापक तसेच सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता, वित्त व लेखा अधिकारी उपस्थित होते.

Dighi : घरखर्चाला पैसे न दिल्याने पतीचा खून; पत्नीला अटक

अचूक बिलिंगसाठी सुरु असलेल्या उपाययोजनांमुळे मीटर रीडिंगचे अस्पष्ट फोटोंचे पूर्वीचे 13.5 टक्के प्रमाण आता केवळ 1.47 टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाली आहे. यंदाच्या एप्रिल ते सप्टेंबरमध्ये मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 775 दशलक्ष युनिटने वीजविक्री वाढली आहे अशी माहिती पवार यांनी दिली. गेल्या एक दोन महिन्यांत सणासुदीचे दिवस असतानाही अचूक बिलिंगचे प्रमाण कायम राहिले व त्यात वाढ झाली ही समाधानाची बाब आहे.

परंतु लक्ष्य100 टक्के अचूक बिलिंग आहे. त्यासाठी प्रामुख्याने ग्रामीण भागात स्थानिक उपाययोजनांना गती दिली पाहिजे. महावितरणच्या बिलिंगची प्रक्रिया पूर्णपणे सेंट्रलाईज व ऑनलाइन आहे. एजन्सीजकडून चुकीचे रिडींग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा किंवा मीटर नादुरूस्त असल्याचा शेरा देणे असे हेतुपुरस्सर केलेले प्रकार लपून राहत नाहीत.

Pune : 22वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव18 ते 25जानेवारीदरम्यान – डॉ. जब्बार पटेल

ग्राहकांचे घर किंवा आस्थापना बंद असणे, वीजमीटरची जागा रीडिंग घेण्यास योग्य नसणे आदी अपवाद वगळता अचूक रीडिंग व स्पष्ट फोटो घेतलेच पाहिजे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पवार यांनी मीटर रीडिंग एजन्सींच्या प्रतिनिधींना दिला. वीजबिलातील रीडिंगचे महावितरणच्या संकेतस्थळावर रीडिंगचा फोटोनुसार पडताळणी करता येते.

योग्य वीजवापराचे बिल मिळत असल्याने ग्राहकांमध्ये समाधान आहे. अचूक रीडिंगप्रमाणे वीजबिल देण्याची प्राथमिक जबाबदारी उपविभाग कार्यालयावर आहे. एजन्सीजकडून मीटरचे रीडिंग घेतल्यानंतर त्याचे फोटो ऑनलाईन पाहणे, रीडिंगमधील अनियमितता तपासणे व असल्यास दुरुस्त करणे आदींची सोय उपविभाग कार्यालयांना उपलब्ध आहे.

त्यामुळे ग्राहकांना वीजबिल देण्यापूर्वीच त्याची योग्य दुरुस्ती करण्याची सोय उपविभाग कार्यालयात उपलब्ध आहे. त्यानुसार अचूक बिलिंगच्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश पवार यांनी दिले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.