Pune : 142 खासदारांचे निलंबन हे देश अराजकतेकडे नेण्याचे लक्षण – अरविंद शिंदे

एमपीसी न्यूज – भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे. (Pune) हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून दान तरूणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला. ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. केंद्रिय गृहमंत्री यांनी केंद्र शासनाची भूमिकेबाबत स्पष्ट निवेदन करावे, अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या 142 खासदारांचे भाजप सरकारने निलंबन केले आहे. याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व इंडिया आघाडीतील काही घटक पक्षाच्या उपस्थितीमध्ये शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे केंद्रातील भाजप सरकार विरोधात निषेध आंदोलन घेण्यात आले.

यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘संविधानाची पायमल्ली करून लोकशाही पध्दतीने निवडून आलेल्या 142 खासदारांचे निलंबन हे देश अराजकतेकडे नेण्याचे लक्षण आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांचे भाजप सरकारने केलेले निलंबन हा एक लोकशाहीवरील अभूतपूर्व हल्ला असून ही एक प्रकारे लोकशाही तत्वांची हत्या आहे. तसेच

लोकशाहीला स्मशान बनविण्याचे काम भाजपकडून सातत्याने (Pune) होताना दिसत आहे. त्यामुळे लोकशाहीच्या या अपमानाच्या विरोधात व आगामी काळात आपल्याला संविधान अबाधित ठेवायचे असेल तर आता आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त ताकतीने एकत्रितपणे भाजप सरकारला कडाडून विरोध करण्याशिवाय गत्यंतर नाही अन्यथा हे RSS प्रणित भाजप सरकार लोकशाहीचा मुडदा पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’’ असे अरविंद शिंदें म्हणाले.

Railway : मध्य रेल्वेच्या ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत 858 बालकांची सुटका

यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील, माजी गृहमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अनंत गाडगीळ, दिप्ती चवधरी, संगीता तिवारी, आप पक्षाचे सुदर्शन जगदाळे आदींची भाषणे झाली.

यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, अविनाश बागवे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, राजेंद्र भुतडा, मेहबुब नदाफ, महिला अध्यक्ष पुजा आनंद, प्रियंका रणपिसे, संगीता पवार, द. स. पोळेकर, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, विशाल जाधव, अक्षय माने, रमेश सोनकांबळे, हेमंत राजभोज, संतोष पाटोळे, दिलीप तुपे, अजित जाधव, विजय खळदकर, मेहबुब नदाफ, समिर शेख, प्रकाश पवार, शिलार रतनगिरी, आशुतोष शिंदे, सुंदरा ओव्हाळ, सिमा सावंत, सोनिया ओव्हाळ, छाया जाधव, ॲड. अश्विनी गवारे, ज्योती परदेशी, नलिनी दोरगे, वाल्मिक जगताप, अभिजीत महामुनी, अविनाश अडसुळ, राज घेलोत, सुरेश चौधरी, रवि ननावरे, सीमा महाडिक, कृष्णा सोनकांबळे, सचिन सावंत आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनाचे सूत्रसंचालन सुजित यादव यांनी केले तर आभार विठ्ठल गायकवाड यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.