Chikhali : गॅस चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गॅस चोरी प्रकरणी चिखली पोलिसांनी कारवाई करत दोघांवर(Chikhali) गुन्हा दाखल केला. या कारवाईमध्ये 31 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 21) सायंकाळी ताम्हाणेवस्ती, चिखली येथे करण्यात आली.

पवन रमेश बिराजदार (वय 26, रा. तळवडे. मूळ रा. कर्नाटक), बालाजी तातेराव टेकाळे (वय 33, रा. देहूरोड, मूळ रा. कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार चेतन सावंत यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्याकडे (Chikhali)कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना त्यांनी मोठ्या गॅस सिलेंडर मधून लहान गॅस सिलेंडरमध्ये गॅसची चोरी केली. या बाबत माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी छापा मारून कारवाई करत 31 हजार 790 रुपयांचा ऐवज जप्त केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

दरोडा विरोधी पथकाची मोरेवस्ती येथे कारवाई

गॅस चोरी प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने देखील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरेवस्ती येथे कारवाई केली. त्यात पोलिसांनी 33 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सचिन भीमराव इंगळे (वय 30, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेली आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश हिंगे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन इंगळे हा घरगुती गॅस सिलेंडर मधून इतर सिलेंडरमध्ये गॅस काढून त्याची चोरी करत होता.

दोघांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईमध्ये 31 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 21) सायंकाळी ताम्हाणेवस्ती, चिखली येथे करण्यात आली.

Pune : अचूक वीजबिलांची टक्केवारी वाढली, पण आणखी सुधारणा करा ; मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचे निर्देश

पवन रमेश बिराजदार (वय 26, रा. तळवडे. मूळ रा. कर्नाटक), बालाजी तातेराव टेकाळे (वय 33, रा. देहूरोड, मूळ रा. कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार चेतन सावंत यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना त्यांनी मोठ्या गॅस सिलेंडर मधून लहान गॅस सिलेंडरमध्ये गॅसची चोरी केली. या बाबत माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी छापा मारून कारवाई करत 31 हजार 790 रुपयांचा ऐवज जप्त केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

दरोडा विरोधी पथकाची मोरेवस्ती येथे कारवाई

गॅस चोरी प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने देखील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरेवस्ती येथे कारवाई केली. त्यात पोलिसांनी 33 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सचिन भीमराव इंगळे (वय 30, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेली आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश हिंगे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन इंगळे हा घरगुती गॅस सिलेंडर मधून इतर सिलेंडरमध्ये गॅस काढून त्याची चोरी करत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.