swiggy delivery boy beaten :काही कारण नसताना स्वीगी डिलीव्हरी बॉयला मारहाण

एमपीसी न्यूज – काही कारण नसताना दोघांनी स्वीगी डिलीव्हरी बॉयला मारहाण कऱण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.3) हिंजवडी फेज तीन येथे विप्रो सर्कल जवळ रात्री घडला आहे.

याप्रकरणी आकाश किसन घारे (वय 26 रा. मावळ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची स्वीगीची डिलीव्हरी देण्यासाठी जात असताना आरोपी त्यांची दुचाकी एमएच 14 जे एस 5107 वरून आले. व त्यांनी फिर्यादी यांच्या गाडीला थांबवून कुठे चालला असे विचारून काही कारण नसताना फिर्यादी यांच्या डोक्यात काहीतरी मारून त्यांना जखमी केले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.