व्हॉटसअप स्टेटसवरून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पवन लष्करे याच्या खूनाचा बदला घेणार म्हणत व्हॉटसअप स्टेटसवर मौत का बदला लेंगे असे स्टेटस ठेवणाऱ्यावर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 26 ऑक्टोबर पासून 3 नोव्हेंबर या कालावधीत घडला.

Pimpri news: हेल्मेट न देणाऱ्या वाहन वितरकांवर कारवाई करा – अपना वतन संघटनेची मागणी

आतीश काळे (व 25 रा.पिंपरी) व अर्जून भिमराव वंजारी (वय 24) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या मोबाईलवरून त्यांचा मित्र व सराईत गुन्हेगार पवन विष्णू लष्करे याच्या खूनाचा बदला घेण्याच्या आशयाने लष्करे याचा फोटो स्टेटसवर ठेऊन त्याला ए दोस्त अपनी दोस्ती की मिसाल एक ना एक दिन जरुर देंगे, चाहे कितने भी दिन गुजर जाए, तेरी मौत का बदला हम जरूर लेंगे अशा आवाजाचा व्हिडीओ बनवून व्हायरल केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन लष्करे याचा टोळक्यांनी जुन्या भांडणातून धारदार शस्त्राने वार करत खून केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.