घरात घुसून विनयभंग व तोडफोड करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरात घुसून तोडफोड व महिलेचा विनयभंग करणाऱ्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळेगाव येतील भोई आळी येथे गुरुवारी (दि.3) रात्री घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अबिद शेख व त्याचा साथीदार यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Illegal moneylending : पुण्यात अवैध सावकारकी करणाऱ्या पती-पत्नीस अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मुलगी घरी असताना आरोपी तेथे आला व त्याने शिवीगाळ करत घरातील महागड्या वस्तूंची तोडफोड केली.तसेच फिर्यादीला त्यांच्या लहान मुलीला मारहाण केले. तसेच फिर्यादीशी गैरवर्तन केले. यावरून दोघांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.