Illegal moneylending : पुण्यात अवैध सावकारकी करणाऱ्या पती-पत्नीस अटक

एमपीसी न्यूज – तक्रारदार महिलेकडून कर्जाची अवाजवी परतफेड मागत तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक 1 यांनी गुरुवारी (दि.3) केली आहे.

जयराम निवृत्ती पोकळे (वय 43) व पत्नी हेमा उर्फ रेखा जयराम पोकळे (वय 36) (दोघे राहणार धायरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.त्यांच्यावर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामतीत तरुण पत्रकारावर गोळीबार; गंभीर जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला आरोपींनी फर्निचर व्यवसायासाठी व औषध उपचारासाठी 6 लाख 75 हजार रुपये 15 टक्के व्याजाने दिले होते. फिर्यादी महिलेने मे 2022 पर्यंत आरोपींना 9 लाख 45 हजार रुपये दिले. तसेच फिर्यादीच्या मैत्रिणीने ही आरोपींकडून 5 लाख 50 हजार रुपये कर्जाने घेतले होते. दोघींचे मिळून आरोपीने आणखी 21 लाख 39 हजार रुपये परत कऱण्याची मागणी केली. फिर्यादी यांच्याकडून आरोपीने सेक्युरेटी म्हणून जबरदस्तीने कोरे चेक, स्टॅम्प पेपर घेतले. 15 दिवसात पैसे परत केले नाही तर घराचा ताबा घेईन असा करारनामा तरयार करत त्यावर जबरदस्तीने सही घेतली. तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून खंडणी विरोधी पथकाने दोन्ही पती-पत्नीला अटक करून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढिल तपास खंडणी विरोधी पथक एक चे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.