Pimpri : डुकरे पकडण्याच्या कारवाईविरुद्ध अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना निवेदन

एमपीसी न्यूज- पुणे, पिंपरी-चिंचवड शहरामधील डुकरे पकडण्याच्या बेकायदेशीर कारवाईविरुद्ध आत्मदहन करण्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम आणि डुक्कर पालन व्यवसाय मालक मंचाने दिला आहे ,तसेच 24 डिसेंबर रोजी पिंपरी- चिंचवड पालिका अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

डुकरे पकडण्याची कारवाई नियमांना धरून नसल्याने कारवाईत हस्तक्षेप करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे २३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री सचिवालयाने हे पत्र स्वीकारले आहे माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम, सुजित हांडे ,गणेश जोशी ,दीपक तुसम ,दीपक सोधे,विकी कीर यांनी हे निवेदन दिले

पुणे आणि पिंपरी -चिंचवड मधील डुकरे पकडण्याची कारवाई बेकायदेशीर,अनिमलवेल्फेअर बोर्डाने ठरवून दिलेल्या निकषानुसार होत नाही,पकडलेली डुकरे कर्नाटकात सोडण्यास कर्नाटक राज्याची परवानगी नसणे आणि डुक्कर पालन व्यावसायिकांची गळचेपी करण्याच्या निषेधार्थ मंत्रालय ,पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका येथे शंभर व्यावसायिक आत्मदहन करणार आहेत,असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम दिला आहे . माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली डुक्कर व्यवसाय मालक संघ संवैधानिक मार्गाने पालिकांच्या डुकरे पकडण्याच्या कारवाईला विरोध करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.