बारामतीत तरुण पत्रकारावर गोळीबार; गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : बारामती येथील रायझिंग महाराष्ट्र या वृत्तपत्राचे प्रतिनिधी गणेश उर्फ आकाश जाधव यांच्यावर गोळीबार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास त्यांच्यावर हा प्राणघात हल्ला झाला. यामध्ये आकाश जाधव हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्रकारावर अशा प्रकारे गोळीबाराची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण बारामतीत खळबळ उडाली आहे.

प्रकरणी अधिक माहिती अशी की, भिगवन रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपा समोर हा सर्व प्रकार घडला. दोन युवकांच्या गटात भांडण झाले आणि त्याच्यातून हा सर्व प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये आकाश जाधव या तरुणाच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली आहे.

Gangster Rupesh Marne: फरार गुंड रुपेश मारणेला मुळशीतून अटक; गुन्हे शाखेची कारवाई

दरम्यान गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.