Gangster Rupesh Marne: फरार गुंड रुपेश मारणेला मुळशीतून अटक; गुन्हे शाखेची कारवाई

एमपीसी न्यूज : व्यावसायिकाचे अपहरण करून 20 कोटीची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत रुपेश मारणे याला अटक करण्यात आली. गुंड गज्या मारणे याच्या टोळीतील तो कुख्यात गुंड आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुळशी परिसरातून त्याला अटक केली आहे. रुपेश मारणे आणि संतोष शेलार अशी अटक केलेल्या दोघा गुंडाची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केली होती. कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह १५ जणांवर मोक्का कारवाई केली. गज्या मारणे याला अटक केली असली तरी रुपेश मारणे व त्याचे साथीदार फरार होते.

Nigdi fraud : दाम दुप्पट करतो असे सांगत अनेकांची फसवणूक

एका व्यावसायिकाने बांधकाम व्यवसायासाठी १ कोटी ८५ लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात २ कोटी ३० लाख रुपये परत दिले होते. तरीही आणखी ६५ लाखांची मागणी करुन या व्यावसायिकाला धमकाविले जात होते. याप्रकरणी रुपेश मारणेसह चौघांवर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.