Chikhali Crime : कारच्या धडकेत वृद्ध जखमी

एमपीसी न्यूज – शेळी चारण्यासाठी गेलेल्या (Chikhali Crime) वृद्धास कारने धडक दिली. त्यात वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 2) सायंकाळी संविधान चौक ते कृष्णानगर भाजी मंडई रोडवर चिखली येथे घडली.

रंगनाथ नेरु राठोड (वय 60, रा. मोरेवस्ती, चिखली) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी श्याम रंगनाथ राठोड (वय 25) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच 14/बीआर 9500) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

swiggy delivery boy beaten :काही कारण नसताना स्वीगी डिलीव्हरी बॉयला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील रंगनाथ राठोड हे संविधान चौक ते कृष्णानगर भाजीमंडई चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबून शेळ्या राखत होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना जोरात धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला, तोंडाला, हाताला, पायाला, कमरेला गंभीर (Chikhali Crime) दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.