उघड्या दरवाज्यावाटे घरातून मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाज्यावाटे घरातून मोबाईल चोरीला गेला आहे. ही चोरी भोसरी येथे मंगळवारी (दि.1) घडली.

विरेंद्र सुरेश लांडगे (वय 29 रा.भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात घुसून विनयभंग व तोडफोड करणाऱ्यावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राहत्या घरातून टेबलवर ठेवलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. यावरून अज्ञात चोरट्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.