Talegaon : नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करा; नवविवाहितेच्या आईचे पोलीस आयुक्तांना साकडे

एमपीसी न्यूज – लग्नानंतर अवघ्या आठवड्यात (Talegaon) पत्नीला कामाला पाठवले. वेगवेगळ्या कारणांसाठी तिचा छळ केला. सुखी संसाराची स्वप्ने पाहिलेल्या नवविवाहितेने अवघ्या दीड महिन्यात छळाला कंटाळून इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पतीसह सासू, सासरे, दीर, जाऊ या सर्वांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी नवविवाहितेच्या अपंग असलेल्या आईने केली आहे. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.

India ws West Indies Test series : भारतीय संघाची दमदार सुरुवात

प्रज्ञा कौशल भोसले असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी प्रज्ञा यांच्या आई प्रतिभा अनिल चव्हाण यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार प्रज्ञा यांचा पती कौशल पिराजी भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र यासाठी कौशल याची आई, वडील, भाऊ आणि भावाची पत्नी देखील जबाबदार असल्याचे पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रज्ञा आणि कौशल यांचा विवाह 11 मे 2023 रोजी झाला.

तुमच्याच मुलीसोबत विवाह करायचा आहे.

तिला सांभाळ आम्ही योग्य पद्धतीने करू, अशी दोन ते तीन महिने जबरदस्ती करून हा विवाह करवून घेतला.

लग्नानंतर घरकाम करण्यासाठी कोणी नसल्याने सासरच्यांनी प्रज्ञा यांना एक महिना माहेरी पाठवले नाही.

सासूने सोन्याच्या साखळीची मागणी केली असता प्रज्ञा यांनी त्यांच्या वैयक्तिक पगारातून पती कौशल याच्यासाठी दोन तोळ्याची सोन्याची साखळी केली.
प्रज्ञा कामावरून घरी आल्यानंतर संपूर्ण कुटुंबाचे कपडे त्यांना धुण्यासाठी देत असत.

कपडे धुवून झाल्यानंतर कौशल याला मेडिकलमध्ये मदत करण्यासाठी पाठवले जात.

रविवारी प्रज्ञा यांना सुट्टी असत. त्या दिवशी देखील घरातील कामे सांगितली जात.

त्यांना शिळे अन्न खायला दिले जात. जावेने देखील माहेरहून काही आणले नाही.

तू तुझा सर्व पगार माझ्या हातात आणून द्यायचा, असे बोलून छळ केला.
प्रज्ञा यांना त्यांच्या दिराने भांडण करण्यासाठी भडकावले. प्रज्ञा यांनी दिराकडे तक्रार केली असता कौशल याने प्रज्ञा यांना धमकावले.

फिर्यादी यांनी काही रक्कम प्रज्ञा यांच्या बँक खात्यात जमा केली होती. त्या पैशांसाठी सासरच्यांनी तगादा लावला होता.

या संपूर्ण प्रकारची चौकशी व्हावी, असेही निवेदनात म्हटले (Talegaon) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.