Talegaon Dabhade: राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – घराच्या छताला तरुणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२६) दुपारी अडीच वाजता जनता सहकारी बँकेशेजारी तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे घडली. आत्महत्येचे कारण अद्यापही समजले नाही.

रुपेश धरमसी चोटलिया (वय ३८ रा. जनता सहकारी बँकेशेजारी तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश चोटलिया याने अज्ञात कारणासाठी राहत्या घरी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता, उपचारापूर्वीच मयत झाला. या घटनेची खबर मयताचा भाऊ रतनसी चोटलिया यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिली.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक संदीप गाडीलकर, पोलीस हवालदार बाबासाहेब जगदाळे यांनी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी केले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गाडीलकर करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.