Talegaon Dabhade: तोल जाऊन विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तोल जाऊन पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार (दि.२५) सायंकाळी ७ च्या सुमारास अॅड रवींद्र दाभाडे यांचे विहिरीत माळवाडी (ता. मावळ) हद्दीतील उघडकीस आली.

रविप्रकाश लालजी गुप्ता (वय ३०, रा. माळवाडी, ता. मावळ, मूळ- उत्तर प्रदेश) असे विहिरीत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविप्रकाश गुप्त हा या परिसरात कष्टाची कामे करत होता. तो विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन विहिरीत बुडून त्याचा मृत्यू झाला. अॅड रवींद्र दाभाडे यांनी त्यांच्या विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली.

त्यानुसार घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक मारुती मदेवाड, पोलीस कर्मचारी प्रशांत भोसले, प्रशांत सोरटे यांनी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी केले. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक प्रशांत सोरटे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.