Pune: प्रकाश जावडेकर यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच नागरिक सभेतून बाहेर

एमपीसी न्यूज – देशभरात लोकसभेची रणधुमाळी चालू असताना प्रत्येक पक्षाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा आणि सभाची तयारी केली जात आहे. तर, यंदा पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या सभेचा प्रचाराचा नारळ प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते कोथरूड येथे फोडण्यात आला. या सभेला सायकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली.

या सभेदरम्यान महायुतीमधील घटक पक्षाच्या सात नेत्यांची खूप वेळ चाललेल्या भाषणामुळे सभा ठिकाणी असलेल्या निम्म्याहून अधिक नागरिकांनी प्रकाश जावडेकर यांच्या भाषणापूर्वी बाहेर पडणे पसंत केले. नागरिक बाहेर जाताना पाहून आयोजकांची एकच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

  • पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रचाराचा नारळ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे तसेच भाजपचे शहरातील आमदार आणि पदाधिकारी सभेला उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.